new-img

लाल तुरीला बाजारात सर्वाधिक मागणी ; अकोला बाजार समितीत तुरीला सर्वाधिक दर । Tur Bajar

लाल तुरीला बाजारात सर्वाधिक मागणी ; अकोला बाजार समितीत तुरीला सर्वाधिक दर । Tur Bajar

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 23 सप्टेंबर 2025 : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) तुरीची आवक ६ हजार २१८ क्विंटल नोंदवली गेली असून, कालच्या तुलनेत आज (दि. २३) आवक घटली आहे. यात लाल तुरीला सर्वाधिक मागणी दिसून आली असून अनेक ठिकाणी भाव ६ हजार रुपयांच्याही वर गेले.

बाजारात पांढरी तूर मर्यादित प्रमाणात आली असली तरी दर मात्र ६ हजारांच्या वर टिकून आहेत. दुसरीकडे स्थानिक तुरीला तुलनेने कमी दर मिळाल्याचे दिसून आले. मंगळवारी झालेली एकूण आवक ६ हजार २१८ क्विंटल असून सर्व बाजार समित्यांमधील दर पाहता एकत्रित सरासरी दर ५ हजार ७८६ प्रति क्विंटल मिळाला आहे.

सर्वात कमी दर २,५०० रुपये मालेगाव बाजार समितीत मिळाला असून अकोला बाजार समितीत सर्वाधिक ६,४२० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यातही लाल तूरीला सर्वाधिक मागणी दिसून आली.