new-img

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

राज्यातील साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा - कृषी मंत्री

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 23 सप्टेंबर 2025 : राज्यात अतिवृष्टीमुळे ६६ लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनो घाबरू नका, या संकटाच्याकाळात राज्य शासन आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे, येत्या दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल,असे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, कामगारांना वेळेत वेतन, बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

मंत्री भरणे म्हणाले, साखर व्यवसायात काम करीत असताना विविध अडअडचणी येत असतात, या अडचणीवर मात करण्याकरिता उपाययोजना केल्या पाहिजे. या क्षेत्राच्या प्रगतीकरिता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर  केला पाहिजे. नवीन वाण विकसित आणि त्या माध्यमातून अधिकाधिक ऊस उत्पादन तसेच साखरेचा उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, या सर्व बाबींचा शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे, यादृष्टीने असोसिएशनने मार्गदर्शन केले पाहिजे.