new-img

कांदा बाजारात मोठी घसरण ; पाहा काय आहे कांद्याला भाव

कांदा बाजारात मोठी घसरण ; पाहा काय आहे कांद्याला भाव

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 22 सप्टेंबर 2025 : सध्या कांदा बाजारात मोठी उलाथापालथ होताना पाहायला मिळत आहे. कांद्याच्या भावात दिवसेंदिवस होणारी घसरण ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. सोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना फटका बसत असून यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे.

मागील महिनाभरात उन्हाळी कांद्याच्या दरात तब्बल ६०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. १ हजार ८०० रुपयांवर असलेला कांदा सध्या १ हजार २०० रुपये भावाने विकला जात आहे. साठवणुकीत असलेला कांदा सडतोय, तर बाजारात नेलेल्या कांद्याला अल्प भाव मिळतोय.

कांद्याच्या लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी ७० हजारापेक्षा जास्त खर्च येतो. मात्र, बदलत्या हवामानामुळे उत्पादन कमी झाले. सरासरी २,१०० क्विंटलऐवजी १०० क्विंटल उत्पादन मिळाल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहेत. सध्याच्या भावानुसार शेतकऱ्यांना एकरी केवळ ५० हजार उत्पन्न मिळत आहे, तर खर्च ७० हजारावर गेल्याने तोटा निश्चित आहे.

कांद्याच्या भावात आलेल्या घसरणीमुळे आणि सड वाढल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हमीभाव, अनुदान आणि साठवण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कृषी संघटनांकडून होत आहे.