new-img

तूर बाजारात तेजी, पाहा काय मिळतोय भाव

तूर बाजारात तेजी, पाहा काय मिळतोय भाव

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 21 सप्टेंबर 2025 : राज्यात एकीकडे कांद्याचे दर घसरले असून त्यामुळे निराश झालेले शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. दुसरीकडे तूर बाजारात मात्र काहीशी तेजी असल्याचे चित्र दिसत आहे.

तूर बाजारात रविवारी (२१ सप्टेंबर) संमिश्र कल दिसून आला. पैठण बाजारात तुरीची आवक अतिशय कमी असल्याने दर स्थिर ६ हजार ६१ वर राहिले, तर बुलढाण्यात लाल तुरीची आवक झाल्याने सरासरी भाव ५ हजार १०० पर्यंत घसरले.

पैठण बाजार समितीमध्ये फक्त ९ क्विंटल आवक झाली तर सर्वसाधारण दर ६ हजार ६१ प्रति क्विंटल राहिला. दुसरीकडे बुलढाणा बाजार समितीमध्ये ५ हजार २ क्विंटल (लाल तूरीची आवक) आवक झाली, यात कमाल दर ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटल तर, सर्वसाधारण दर ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल राहिला.