new-img

चांदवडहून पंजाब पूरग्रस्तांना 30 टन कांदा !

चांदवडहून पंजाब पूरग्रस्तांना 30 टन कांदा !

चांदवड बाजार समितीच्या कांदा व्यापारी असोसिएशनकडून मदतीचा हात

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 20 सप्टेंबर 2025 : पंजाब राज्यातील पूरग्रस्तांसाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व्यापारी असोशिएशनने मदतीचा हात पुढे केला आहे. संघटनेच्या माध्यमातून तब्बल 30 टन कांदा पंजाब पूरग्रस्तांना पाठविला आहे. मंगळवारी (दि. १६) रोजी येथील बाजार समितीतून ३० टन कांदा भरलेला ट्रक पंजाबकडे रवाना झाला आहे. संघटनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.